आयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘राम जन्मभूमी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९० साली झालेल्या गोळीबारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित ‘राम जन्मभूमी’ हा चित्रपट असून डिसेंबरमध्ये तो प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

‘राम जन्मभूमी हा चित्रपट जरी आयोध्येमधील राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावर आधारित असला तरीदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे पुरेपूर लक्ष देण्यात आलं आहे’, असं सय्यद वसीम रिझवी यांनी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले, ‘राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात सुरु असल्यामुळे त्याच्याशी संबंधित एकही मुद्दा या चित्रपटात घेण्यात आलेला नाही. समाजात असलेल्या वाईट प्रवृत्ती या चित्रपटातून मांडण्यात आल्या असून द्वेषाचे वातावरण संपावे अशी या चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे’.  या चित्रपटाची निर्मिती वसीम रिझवी यांनी केली असून चित्रपटाची कथादेखील त्यांनीच लिहीली आहे. तर चित्रपटाचं अधिकांश चित्रीकरण अयोध्यामध्ये पार पडलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रिझवी यांनीही एक भूमिका पार पाडली आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram janmabhumi trailer and poster launch
Show comments