संजय लीला भन्सालीचा ‘राम लीला’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, तरीही या चित्रपटामागचे वाद अद्याप काही संपुष्टात आलेले नाही. अलाबाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने ‘गोलियो की रासलीलाः राम लीला’ चित्रपटाच्या उत्तर प्रदेशातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
न्यायाधीश देवी प्रसाद सिंह आणि अशोक पाल सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बहारिच येथील मर्यादा पुरूषोत्तम भगवान रामलीला समितीने या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. चित्रपटाला राम लीला असे शीर्षक देऊन त्यात बिभत्स आणि हिंसक दृश्ये दाखविण्यात आली आहेत.  
१५ नोव्हेंबरला ‘राम लीला’ प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.

Story img Loader