राज कपूर यांच्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. तिच्या अभिनयापेक्षा गाजली ती दाऊद इब्राहिमसोबतच्या प्रेमप्रकरणाने, राम तेरी गंगा मैली चित्रपट यशस्वी झाला आणि तिने त्यापाठोपाठ अनेक चित्रपटात ती दिसली. तेजाब चित्रपटात ती माधुरीसोबत झळकली होती. अनेक वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब राहिलेली मंदाकिनी सध्या एका गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली खरेची नवी इनिंग सुरु, लंडनमध्ये सुरू केले काम

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

माँ व माँ या गाण्यात ती आपल्या मुलासोबत म्हणजे रबिल ठाकूर, अभिनेत्री बबिता बॅनर्जी आणि बालकलाकार सिमरन आणि चिराग यांच्यासोबत ती काम करत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याच्या टीझरची झलक पोस्ट केली आहे ज्यात तिने असं लिहले आहे की ‘गाणे लवकरच येत आहे’. साजन अग्रवाल दिग्दर्शित ‘माँ ओ मा’ हा म्युझिक व्हिडिओ लवकरच फिल्मी क्लॅप यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.

मंदाकिनीचा जन्म ३० जुलै १९६३ रोजी मेरठमध्ये झाला. तिची आई काश्मिरी आणि वडील ब्रिटिश होते. १९९० साली ती दलाई लामा यांची अनुयायी बनली. सध्या ही अभिनेत्री मुंबईत योगा शिकवण्यासोबत तिबेटी हर्बल सेंटर चालवते. तिने डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले आहे.

हिंदी चित्रपट जगतात आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मंदाकिनी राम तेरी गंगा मैली या चित्रपटाने रातोरात स्टार बनली. या चित्रपटातील तिचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. यातील तिच्या बोल्ड सीन्सची तेव्हा खूप चर्चा झाली होती.

Story img Loader