१९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामुळे अभिनेत्री मंदाकिनी रातोरात स्टार झाल्या होत्या. या चित्रपटात मंदाकिनी यांचा बोल्डनेस पाहून प्रेक्षक हैराण झाले होते. त्यांचा धबधब्याच सीन आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. याशिवाय या चित्रपटात मंदाकिनी यांनी ब्रेस्टफीड सीनही दिला होता. चित्रपटातील या दृश्याचीही खूप चर्चा झाली होती. चित्रपटातील या काही दृश्यांमुळे मंदाकिनी एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे बरेच वादही झाले होते. पण आता तब्बल ३७ वर्षांनंतर या सर्व वादांवर मौन सोडलं आहे.

मंदाकिनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ब्रेस्टफिडिंगच्या या सीनवर मोकळेपणाने बोलताना त्यांच्यावर झालेल्या टीकेला सडेतोड उत्तरही दिलं आहे. जेव्हा मंदाकिनी यांनी हा सीन दिला होता तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्या दृश्यात केवळ त्यांचे क्लिवेज दिसत होते. आजकाल लोक त्यापेक्षाही जास्त अंगप्रदर्शन करतात असंही यावेळी मंदाकिनी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा-बॉलिवूडच्या ‘या’ बोल्ड अभिनेत्रीचे पुनरागमन, व्हिडिओ होतोय व्हायरल

मंदाकिनी म्हणाल्या, “सर्वात आधी हे जाणून घ्या की तो सीन ब्रेस्टफिडिंगचा नव्हताच. तो तशाप्रकारे शूट करण्यात आला होता कारण लोकांना पाहताना तो अश्लील वाटू नये. सीन शूट करण्यामागचीही खूप मोठी कहाणी आहे. त्यावेळी जेवढे माझे क्लिवेज दिसले होते. तेवढे तर आता लोक कपडे परिधान करूनही दाखवतात. तो सीन खूप पवित्र होता आणि तशाच भावनेने तो शूट करण्यात आला होता. आजकाल मात्र सर्व चित्रपटांमध्ये फक्त सेक्शुअलिटी पाहायला मिळते.”

आणखी वाचा-‘अशी’ झाली होती कियारा- सिद्धार्थची पहिली भेट, करण जोहरने केला मोठा खुलासा

दरम्यान मंदाकिनी २६ वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. लवकरच त्या ‘माँ ओ माँ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मी मागच्या बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याचा विचार करत होते. पण आता ते स्वप्न पूर्ण होत आहे. “

Story img Loader