दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित रमन राघव २.० या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटातून बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांसमोर येत असून ट्रेलरमधील त्याचा अभिनय थक्क करणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी रमन या सिरिअल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरूवातीपासूनच नवाजुद्दीनचा अभिनय प्रेक्षकांची पकड घेतो. आपण लोकांवर हल्ले करून त्यांना क्रूरपणे कसे मारले, याची पोलिसांसमोर कबुली देतानाचा त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा करणार आहे. यामधील त्याचा लूक आणि अभिनय या दोघांमुळे रमन ही व्यक्तिरेखा निश्चितच एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचली आहे.
याशिवाय, ट्रेलरमध्ये विकी कौशल राघवन या ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसतो. या अधिकाऱ्याने रमणला पकडण्याची आणि हत्यांचा छडा लावण्याची जबाबदारी स्विकारलेली असते. ‘रमन राघव २.०’ हा चित्रपट यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार असून, चित्रपटातगृहात २४ जून रोजी दाखल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raman raghav trailer nawazuddin siddiqui strikes back with a solid return