ओम राऊत दिग्दर्शित आणि मनोज मुंतशिर लिखित ‘आदिपुरुष’ चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीजर प्रदर्शनावेळी झालेल्या वादामुळे चित्रपट प्रदर्शनानंतरही हा वाद कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला असून आता चित्रपटाच्या संवादांपासून ते सादरीकरणापर्यंत सर्वच बाबतीत तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आधी चित्रपट रामायणावर आधारित आहे असं म्हणणाऱ्या मनोज मुंतशिर यांनी आता चित्रपट रामायणापासून प्रेरित असल्याची भूमिका घेतली आहे. या सर्व वादावर आता रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक हिंदू संघटनांचा ‘आदिपुरुष’ चित्रपटावर आक्षेप

‘तेल तेरे बाप का, जलेगीभी तेरे बाप की’ अशा प्रकारचे संवाद हनुमानाच्या तोंडी ऐकून मोठ्या संख्येनं प्रेक्षक नाराज झाले आहेत. चित्रपटातील पात्रांच्या पेहेरावापासून त्यांच्या व्यक्तिरेखेपर्यंत ज्या प्रकारे गोष्टी रंगवण्यात आल्या आहेत, त्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, नेटिझन्सनीही सोशल मीडियावर मीम्सपासून सविस्तर पोस्टपर्यंत अनेक प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, असं असलं, तरी दुसरीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात यशस्वी ठरत आहे. त्यामुळे नेमके चित्रपटावर घेण्यात आलेले आक्षेप योग्य की अयोग्य? यावर चर्चा सुरू झाली आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
vikrant massey rajkumar hirani web sereies debut
राजकुमार हिरानींचा मुलगा ‘या’ वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…

एकीकडे प्रेक्षकांची नाराजी व्यक्त होत असताना दुसरीकडे लेखक मनोज मुंतशिर यांनी ज्या संवादांवर सर्वाधिक आक्षेप घेण्यात आले, ते काही संवाद वगळण्याची किंवा बदलण्याची तयारी दर्शवली आहे. या आठवड्याभरात ते संवाद बदलले जातील, असा विश्वासही त्यांनी प्रेक्षकांना दिला आहे.

प्रेम सागर यांची ‘आदिपुरुष’ चित्रपटावर नाराजी

दरम्यान, एकीकडे हा सगळा वाद चालू असताना चित्रपटाची तुलना भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘रामायण’ या दूरदर्शनवरील मालिकेशी केली जात आहे. रामानंद सागर यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. आता रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी आदिपुरुष चित्रपटावर आपली सविस्तर भूमिका नाराजीच्या रुपात व्यक्त केली आहे.

“मी मनोज मुंतशीर यांचे जे यूट्यूब व्हिडीओ पाहिलेत, त्यावरून ते फार चांगले संस्कारी हिंदुत्ववादी, सनातन धर्माचे प्रचारक, फार मोठे ज्ञानी वाटले. पण मला कळत नाहीये की आदिपुरुषमध्ये त्यांनी या प्रकारचे संवाद लिहिलेच कसे? त्यांचा अंदाज चुकला की ते संवाद आजच्या पिढीसाठी आहेत. जर ते आजच्या पिढीसाठी असतील तर मग जनतेसाठी तुम्ही असं काहीही करू शकत नाही. तुम्ही हे विसरू नका की ते वाल्मिकीवर आधारित आहे. नाहीतर तुम्ही मग त्याला दुसरं काहीतरी नाव द्या. रामायण शब्द म्हणू नका. एखादी फॅण्टसी बनवा. पण जेव्हा तुम्ही रामायण म्हणता, तेव्हा तुम्ही त्याच्याशी खेळू शकत नाही”, असं प्रेम सागर एएनआयशी बोलताना म्हणाले.

‘आदिपुरुष’च्या ट्रोलर्सला क्रिती सेनॉनने दिले सडेतोड उत्तर; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “माझे लक्ष फक्त टाळ्यांचा आवाज अन्…”

“ज्ञानाबरोबर त्याची जबाबदारीही येते”

“हे सगळं लोक भक्तीभावाने बघतात. सरस्वती सगळ्यांकडे जात नाही. तुमचे वडील श्रीमंत होते किंवा तुम्ही घोटाळा केला तर तुमच्याकडे पैसे येतात. पण सरस्वती त्याच्याकडेच जाते, ज्यानं योगदान दिलेलं असतं. सरस्वती येते तेव्हा तिची काही बंधनंही येतात. त्या कलेची जबाबदारी, कलेचा गैरवापर या सगळ्यांचं भान ठेवणं गरजेचं आहे. कला तलवारीला पराभूत तर करेल, पण तुम्ही तिचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करू शकत नाही”, असं प्रेम सागर म्हणाले.

“हे संवाद माझे नाहीत…” ‘आदिपुरुष’मधील “तेल तेरे बाप का..” या संवादावर मनोज मुंतशीर यांचं स्पष्टीकरण

“या भारताच्या सनातन धर्माच्या भूमीत कणाकणात रामाची प्रतिमा, भक्ती आहे. तिच्याशी तुम्ही खेळू शकत नाही. हनुमानजींचंही तसंच आहे. मी रोज हनुमानजींचा जप करतो. त्यांच्याबद्दल काहीही करताना तुम्हाला काही नैतिक मूल्य कायम ठेवावीच लागतील. त्यांच्याशी अशा गोष्टी जोडणं योग्य नाही”, अशा शब्दांत प्रेम सागर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

Story img Loader