मराठीमध्ये सध्या नवनवीन विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता काही ऐतिहासिक, विनोदी मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातच आता आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये मराठीमधील आघाडीचे कलाकार काम करताना दिसतील. या चित्रपटाची खासियत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधील दोन नावाजलेली नावं ‘राष्ट्र – एक रणभूमी’च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.
आणखी वाचा – Video : तीन वेळा आयव्हीएफ, हाती अपयश अन् गंभीर आजाराचं निदान, अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर
‘राष्ट्र – एक रणभूमी’ चित्रपट करोना महामारीमुळे रखडला. अखेरीस आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. राजकारण तसेच राष्ट्रभक्तीवर आधारित हा चित्रपट आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या ‘राष्ट्र – एक रणभूमी’मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत.
दोन्ही नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वांची या चित्रपटामध्ये नेमकी कोणती भूमिका असणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली ‘राष्ट्र’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, दिवंगत अभिनेत्री रिमा लागू, संजय नार्वेकर यांसारखे मराठीमधील आघाडीचे कलाकार यामध्ये काम करताना दिसतील.
पाहा व्हिडीओ –
आणखी वाचा – “तुम्ही खूप कमी बोलता अन्…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘राष्ट्र’च्या माध्यमातून इंदरपाल यांनी मराठी सिनेदिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ‘राष्ट्र’ २६ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होईल.