‘सामना’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि ‘सर्वसाक्षी’ व ‘सुर्वन्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामदास फुटाणे दोन दशकानंतर पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले आहेत. निर्माते शिवकुमार लाड यांच्या निर्मिती संस्थेसाठी त्यांनी ‘सरपंच भगीरथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आरक्षण या विषयाभोवतीच्या या चित्रपटाची गाणी श्रावण व भाद्रपद या महिन्यातील सणांमध्ये लोकप्रिय व्हावीत यासाठी या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिफित खूप लवकर प्रकाशित करण्यात आली. रितेश देशमुख याच्या हस्ते या ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले.
या चित्रपटात उपेन्द्र लिमये, वीणा जामकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम, सविता माहपेकर, बालकलाकार श्रृती आणि तन्वी थोरात यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची गिते संभाजी भगत आणि प्रकाश घोडके यांची असून, त्यांना संभाजी भगत यांचे संगीत आहे.
रामदास फुटाणे यांना असलेली सामाजिक विषयाची जाणिव पाहता या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा