‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील दावा सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षिस देऊ असा दावा केरळातील एका मुस्लीम संघटनेनं केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना अभिनेते योगेश सोमण यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे. रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असंच मी म्हणेन, असं योगेश सोमण म्हणाले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबत खुलासा केला आहे.

संबंधित व्हिडीओत योगेश सोमण म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काहीजणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले. पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरळ स्टोरी’ची ‘वन लाइन’ कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.”

हेही वाचा- “‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान; म्हणाले, “अधिकृत आकडा…”

किती गुजरीणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या ।
किती शांबूखी जहाजी फाकविल्या ।
किती एक देशांतरी त्या विकिल्या ।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।।

योगेश सोमण नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील श्लोकाच्या या चार ओळी ‘द केरळ स्टोरी’ची संपूर्ण कथा सांगतात. यातील ‘शांबूखी’ शब्दाचा अर्थ सांगताना सोमण म्हणाले, ‘शांबूखी’ हा शब्द’शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, ‘किती शांबूखी जहाजी फाकविल्या’ म्हणजे ‘किती शहामुखी जहाजा पाठवल्या’. रामदास स्वामींनी चार ओळीतून संपूर्ण ‘द केरळ स्टोरी’ची कथा शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas swami wrote story of the kerala story movie hundreds of years ago actor yogesh soman viral video rmm