बॉलिवूड चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट यांच्यामध्ये गेली अनेक वर्ष तुलना केली गेली आहे. बरेच वर्ष बॉलिवूड चित्रपटांना सर्वश्रेष्ठ ठरवत दक्षिणात्य चित्रपटांची अनेकांनी खिल्ली उडवली. आता यावर ‘बाहुबली’मध्ये ‘भल्लाल देव’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राणा दग्गुबाती याने परखड शब्दात भाष्य केलं आहे.
अभिनेता राणा दग्गुबातीचे नाव दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते. त्याचे फॅन फॉलोईंग ही प्रचंड मोठे आहे. प्रेक्षक त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असतात. आज दक्षिणात्य चित्रपट बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आता यावर राणाने आपलं मत मांडलं आहे.
आणखी वाचा : गश्मीर महाजनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार प्रमुख भूमिकेत
नुकतीच त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तो म्हणाला, “गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण पाच वर्षांपूर्वी हेच प्रेक्षक दक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवायचे. हा दाक्षिणात्य चित्रपट आहे, हा चित्रपट कोणी का बघेल? असं प्रेक्षक म्हणायचे. या अशा परिस्थितीत आता दक्षिणात्य चित्रपट जी दमदार कामगिरी करत आहेत त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत.”
राणाचं हे बोलणं त्याच्या चाहत्यांना खूप भावलं असून ते आवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. राणाने केलेल्या विधानाबद्दल सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.
हेही वाचा : ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती लवकरच होणार बाबा? प्रेग्नन्सीच्या चर्चांवर पत्नीनं सोडलं मौन
दरम्यान येत्या काळात राणा अभिनेता वेंकटेश यांच्याबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे, शिवाय त्याच्या ‘हिरण्यकश्यप’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोन्ही चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येतील आणि राणाचं रांगडं व्यक्तिमत्व आणि सुंदर अभिनय पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.