‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ असे नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच या वेबसीरिज ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रानबाजार’ ही वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोन्ही टिझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या टिझरला १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
आणखी वाचा- प्लॅस्टिक सर्जरीमुळे वयाच्या अभिनेत्रीचं २१ व्या वर्षी निधन
अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.