अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रिकरण श्रीलंकेत करण्यात आले. बॉम्बे वेल्वेट द्वारे रवीना टंडन चित्रपटसृष्टीत पुर्नपदार्पण करत असून यात रणबीर, अनुष्का आणि रवीना रेट्रो लूकमध्ये दिसणार आहेत.
फोटो गॅलरीः फर्स्ट लूक- ‘बॉम्बे वेल्वेट’
‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटात रणबीरने जॉनी बलराजची भूमिका साकारली असून तो बॉक्सर आणि स्ट्रीट फायटर आहे. अनुष्का शर्माच्या पात्राचे नाव रोजी असून ती जॅज सिंगर आहे. तर रवीनानेसुद्धा जॅज सिंगरची भूमिका साकारली आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’चे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर सिनेमाच्या संपूर्ण टीमने अनुष्काला शॅम्पेनची बाटली, फुलांचा गुच्छ आणि केक भेट रुपात दिला. या केकवर लिहिले होते,  ‘धन्यवाद रोजी. आमच्या स्टार स्टार गायिकेला खूप खूप शुभेच्छा.’
हा चित्रपट २५ डिसेंबर २०१४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader