आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र लालसिंग चड्ढाप्रमाणे ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड देखील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आलिया भट अनेक ठिकाणी जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग गेल्या शुक्रवारपासून सुरू झाले आहे. यानंतर शनिवारी सामान्य आणि थ्रीडी शोचेही बुकिंग करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शित होण्याऱ्या दिवसाची दीड लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्याच वेळी, या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून ५.४६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच वेळी, जर यात ब्लॉक सीट्स जोडल्या गेल्या तर चित्रपटाने ७.६७ कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले जाई.

“बाय बाय यश समीर…” श्रेयस तळपदेचा फोटो शेअर करत संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक

कार्तिकच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार?

यावर्षी कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’ चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग आतापर्यंतची सर्वाधिक होती, ज्याने ब्लॉक सीट्स जोडून ६.५५ कोटी रुपये कमवले. आता ‘ब्रह्मास्त्र’ने रिलीजपूर्वीच ७.६७ कोटी कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून ३ दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत हा आकडा वाढू देखील शकतो. दाक्षिणात्य चित्रपट आर आर आर ‘ आणि ‘केजी एफ चॅप्टर २’ या चित्रपटांचे हिंदी आवृत्ती वगळता २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर फक्त कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा सिनेमा प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४. ११ कोटींचा व्यवसाय केला होता.

‘ब्रह्मास्त्र’ भारतात जवळपास ५ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता नागार्जुनही जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir alia starter brahmastra film advance booking break record of bhool bhulaiya 2 spg