अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच आलियानं या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटींनी देखील कमेंट करत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर कंडोम ब्रँड ड्युरेक्सनं देखील एक मजेदार पोस्ट करत आलिया आणि रणबीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना सोनम कपूर, जेनेलिया डिसूजा, माधुरी दीक्षित, टाइगर श्रॉफ, तमन्ना भाटिया, जान्हवी कपूर, अनिल कपूर, सोनू सूद, दीया मिर्जा, मौनी रॉय, मनीष मल्होत्रा यासांरख्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण सर्वाधिक चर्चेत राहिली ती ड्युरेक्स ब्रँडची सोशल मीडिया पोस्ट.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन

आणखी वाचा- The Kashmir Files नंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘दिल्ली फाइल्स’, ‘या’ विषयावर आधारित आहे आगामी चित्रपट

ड्युरेक्सनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी रणबीर कपूरचं लोकप्रिय गाणं ‘चन्ना मेरेया’चा रेफरन्स देत मजेदार मेसेज लिहिला आहे. त्यांनी लिहिलं, ‘डियर रणबीर आणि आलिया, महफिल में तेरी हम ना रहे जो, फन तो नहीं है.’ त्यांचं ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सच्या मजेदार कमेंट पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा- Alia Ranbir Wedding : आलियाच्या मंगळसूत्राची सगळीकडे चर्चा, डिझाइनचं रणबीरशी आहे खास कनेक्शन!

दरम्यान आलिया आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या विवाहसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि काही मोजके नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या सर्व विधी पंजाबी रितीरिवाजा प्रमाणे पार पडल्या. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

Story img Loader