राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा असून प्रदर्शनापूर्वीच तो लोकप्रिय झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील रणबीरचा लूक पाहता प्रत्यक्षात संजयलाच पाहत असल्याचा भास होतांना दिसतो. रणबीरच्या लूक आणि अभिनयाचं कौतुक होत असतानाच अभिनेता सलमान खानने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता रणबीरने सलमानला प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘संजू हा चित्रपट उत्तम असेल यात शंकाच नाही. मात्र या चित्रपटामध्ये संजूची भूमिका वठविण्यासाठी खुद्द संजय दत्तचीच निवड का करण्यात आली नाही. हा चित्रपट संजयच्या जीवनावर आधारित असल्यामुळे या चित्रपटाला संजयने उत्तम न्याय दिला असता. संजयने या सा-या गोष्टी अनुभवल्या आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा ही भूमिका कोणताच कलाकार चांगल्या प्रकारे करु शकणार नाही’, असं सलमानने ‘रेस ३’च्या प्रमोशनवेळी म्हटलं होतं.

Photo: ‘फर्जंद’ साकारणाऱ्या अंकित मोहनचा क्लिन शेव्ह लूक पाहिलात का?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने सलमानच्या या प्रतिक्रियेला उत्तर दिलं. ‘ज्या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट आधारित आहे त्याच व्यक्तीने भूमिका साकारली असं याआधी कधीच घडलं नाही. यामुळे व्यक्तिरेखेचा प्रभाव नष्ट होतो. संजय दत्त यांच्याशी माझी तुलना होईल हे माहितीच होतं आणि म्हणूनच मी भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मी संजय दत्त यांच्या २० किंवा ४० वर्षांच्या अवतारात असो, प्रेक्षक एका कलाकाराला पाहतील. हे खरं आहे की मी दुसरा संजय दत्त होऊ शकत नाही,’ असं रणबीर म्हणाला.

संजयच्या भूमिकेवरून रणबीरने सलमानवर पलटवार केला असून आता त्यावर सलमान काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir hits back at salman khan for saying sanjay dutt should play himself in sanju