महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अभिनेता रणबीर कपूरचे कौतुक केले आहे. मोठा अभिनेता असे त्यांनी रणबीरचे वर्णन करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजूबा’ चित्रपटामध्ये तुम्ही रणबीर कपूरला पाहिले होते का, असा प्रश्न अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर या दोन्ही अभिनेत्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून चाहत्यांना विचारला होता. याच ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी २५ वर्षांनंतर मोठा अभिनेता झालेला असे रणबीरचे वर्णन केले आहे.
अमिताभ बच्चन सध्या शूजित सरकार यांच्या आगामी पिंक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात ते एका वकिलाची भूमिका बजावणार आहेत. अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी यांच्या भूमिका असलेल्या सुजय घोष निर्मित तीन याही चित्रपटात अमिताभ बच्चन दिसणार आहेत.
रणबीर कपूर ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘जग्गा जासूस’ या दोन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
T 2224 – Did you see little Ranbir Kapoor in one of the Ajooba pictures .. !! so cute .. 25 years later, huge star ! pic.twitter.com/S9mtKLf0wu
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 12, 2016