सिनेसृष्टीत अनेक कलाकार येतात आणि जातात, मात्र असे काही दिग्गज कलाकार असतात जे जगाचा निरोप घेऊनही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचेही नाव याच यादीत घेतले जाते. ऋषी कपूर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांनी ऋषी कपूर यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. याबाबतचा एक खास व्हिडीओ अभिनेता फरहान अख्तरने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता फरहान अख्तरने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा संपूर्ण व्हिडीओ ऋषी कपूर यांच्या कर्ज चित्रपटातील ओम शांती ओम या गाण्यावर तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे हे कलाकार या गाण्यातील काही ठराविक स्टेप्स जशाच्या तशा करताना दिसत आहे.

“शूटींगदरम्यान माझे वडील आजारी पडले होते पण…”, ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाविषयी रणबीर कपूरचा खुलासा

या व्हिडीओत आमिर खान, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, फरहान अख्तर, विकी कौशल, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, आधार जैन आणि तारा सुतारिया यांसारखे कलाकार दिसत आहे. या सर्व कलाकारांनी जुन्या दिवसांची आठवण करुन देण्यासाठी ऋषी कपूर यांच्याप्रमाणे वेशभूषा केली आहे.

या व्हिडीओची सुरुवात ऋषी कपूर यांच्या ओम शांती ओम या गाण्याने होते. त्यावर ऋषी कपूर यांचा जुना व्हिडीओ सुरु असल्याचे दिसत आहे. ऋषी कपूरनंतर रणबीर कपूर हा हुबेहुब त्यांच्याप्रमाणेच कपडे परिधान करुन त्याच गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यानंतर इतर सर्व कलाकारही या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

दरम्यान ‘शर्माजी नमकीन’ हा ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेचं चित्रीकरणदेखील अर्ध्यावर राहिलं होतं. त्यानंतर त्यांच्या जागी परेश रावल यांनी ही भूमिका साकारत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. आज ३१ मार्च रोजी अॅमेझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Sharmaji Namkeen Trailer : अखेरच्या चित्रपटात ऋषी कपूर यांचा दमदार अभिनय, ‘शर्माजी नमकीन’ ट्रेलर चर्चेत

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर हितेश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातून एका ६० वर्षीय व्यक्तीची कथा सांगितली जाणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor alia bhatt kareena kapoor and others dance to om shanti om as a tribute to rishi kapoor video viral nrp