गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनसराई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर आता बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहे. गेल्या महिन्याभरापासून या दोघांच्या लग्नाबद्दल विविध चर्चा सुरु होत्या. अखेर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध…लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाहसोहळ्यासाठी कुटुंबातील व्यक्तींसह अनेकांनी हजेरी लावली. यावेळी करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, आकाश अंबानी यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट या दोन्हीही कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संजय दत्तनं लग्नाआधी रणबीर कपूरला दिला खास सल्ला, म्हणाला…

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा नुकतंच संपन्न झाला आहे. काही मिनिटांपूर्वी त्या दोघांची सप्तपदी पार पडली आहे. त्यामुळे आता ते दोघेही अधिकृतरित्या पती-पत्नी बनले आहेत. आलिया आणि रणबीरचे लग्नासाठी चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले. विशेष म्हणजे सप्तपदी घेण्यापूर्वी गायत्री मंत्राचे पठणही करण्यात आले.

“राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची…”, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत. त्यांचे लग्न लागल्याची माहिती जरी मिळाली असली तरी अद्याप या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर कपूर आणि भट्ट कुटुंबियांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. मात्र त्या नववधू-वराचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नानंतर सिनेसृष्टीतील इतर कलाकार आणि कुटुंबियांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. मात्र आता त्यात मोठा बदल करण्यात आला आहे. येत्या १६ किंवा १७ एप्रिलला पार पडणारे हे रिसेप्शन काही कारणांमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor alia bhatt wedding alia and ranbir are officially married take pheras in the presence of family friends nrp