बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता आहे. रणबीर आणि आलिया यांनी याबाबत अद्याप मौन बाळगलं असलं तरीही या दोघांच्या लग्नाबाबत आता काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्या दोघांच्या लग्नात ४५० लोकांना आमंत्रण असून काही बड्या सेलिब्रिटींना त्यांनी आमंत्रण दिले नाही, अशा चर्चा सुरु आहेत.
रणबीर आणि आलियाच्या लग्नात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif), कंगना रणौत (Kangana Ranaut), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि गोविंदा (Govind) हे कलाकार दिसणार नाहीत. आपापसातील काही वादांमुळे या सेलिब्रिटींना आमंत्रण दिले नसल्याचे म्हटले जात आहे. यामागचे नक्की कारण ते जाणून घेऊया…
आणखी वाचा : कतरिनाच्या या बोल्ड फोटोवर सासऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा फोटो
आणखी वाचा : “मी पुन्हा शेंगा विकेन पण…”, कच्चा बादाम फेम गायकाला होतोय पश्चाताप
सलमान खानला लग्नाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही अशी माहीती समोर आली आहे. पण निमंत्रण दिले तर सलमान जाणार का असाही प्रश्न आहे. कारण रणबीर आणि सलमानचे संबंध काही बरे नाहीत. यासाठी रणबीर आणि कतरिनाचे रिलेशनशिप याला कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.