रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी ऑनस्क्रीन पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरते. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटानंतर ही जोडी ऑनस्क्रीन पुन्हा कधी एकत्र झळकलीच नाही. आता तीन वर्षांनंतर एका जाहिरातीच्या निमित्ताने रणबीर-दीपिका एकत्र आले आहेत. या जाहिरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून ‘ये जवानी है दिवानी’मधल्या नैना तलवार आणि बनीची आठवण तुम्हालाही नक्की येईल.

‘एशियन पेंट्स’च्या जाहिरातीत रणबीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. जाहिरातीत रणबीर-दीपिकाच्या मैत्रीला अधोरेखित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या फॅन क्लबने शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. त्यात दोघंही निवांत कॉफी पिताना दिसले. हेच दृश्य जाहिरातीच्या शेवटी पाहायला मिळतंय. घराला कोणता रंग द्यावा याबाबत संभ्रमात असलेला रणबीर दीपिकाला कॉल करतो. फोनवरील दोघांचा गमतीशीर संवाद आणि त्यानंतर ऑनस्क्रीन दोघांची मैत्री पाहून ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाची आठवण होते.

वाचा : बप्पी लहरींच्या गाण्याची जादू मार्व्हल स्टुडिओवरही

दीपिका आणि रणबीर एकत्र काम करण्याबाबत दीपिकाचा पती रणवीर सिंगला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माझी काहीच हरकत नसल्याचं रणवीरने सांगितलं होतं.

Story img Loader