दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. येत्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी गाजत असलेल्या या चित्रपटात रणबीर आणि अनुष्काची लिपलॉक प्रकारातील अनेक चुंबनदृश्ये असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांत सध्या रंगली आहे. 

डीएनए या वृत्तपत्राच्या माहितीनूसार, ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये रणबीर-अनुष्का यांची केवळ एक -दोन नव्हे तर, सात प्रदीर्घ चुंबनदृश्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्तानूसार दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटात या दोघांतील केमिस्ट्रीचा चित्रपटात चांगलाच उपयोग करून घेतल्याचे म्हटले आहे. चित्रपटाच्या पुढील ट्रेलरमध्ये या चुंबनदृश्यांची झलक पहायला मिळू शकते. ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ पुस्तकावर आधारीत या चित्रपटात मुंबईतील १९५० आणि १९६० चा काळ दर्शविण्यात आला आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता रणबीर कपूर एक बॉक्सर आणि स्ट्रिट फायटरची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर अनुष्का शर्मा ७०च्या दशकातील जॅझ गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader