काही दिवसांपूर्वी रणबीर-आलिया आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे यूट्यूबवर प्रमोशन करत होते. यादरम्यान रणबीरने आलियाच्या गरोदरपणात वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली. त्यानंतर रणबीर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला. मात्र, आता रणबीरने त्याच्या वक्तव्याबद्दल लोकांची माफी मागितली आहे.

हेही वाचा – उर्फी जावेदने उडवली अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ चित्रपटाची खिल्ली; म्हणाली, “हा चित्रपट ३०…”

प्रमोशनच्या लाइव्ह सेशनदरम्यान आलिया म्हणाली, आम्ही चांगल्या लेव्हलवर चित्रपटाचे प्रमोशन करू, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ. पण सध्या आम्ही जास्त ठिकाणी पोहोचू शकत नाही, कारण आमचं लक्ष दुसरीकडे आहे. याच दरम्यान, रणबीर आलियाच्या बेबी बंपकडे बोट दाखवत कारण आता कोणी पसरतंय (वजन वाढतंय या अर्थाने) असं म्हणाला. तर, रणबीरच्या या जोकवर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला धारेवर धरलं. तो भावना नसलेला आणि असंवेदनशील आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं.

हेही वाचा – ‘हिला दगड मारा’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना उर्फीचं हटके उत्तर; दगडांपासून बनवला ड्रेस

ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनदरम्यान रणबीरला त्याच्या या जोकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सर्वांची माफी मागितली. “माझं माझी पत्नी आलियावर खूप प्रेम आहे. मी फक्त मस्करी करत होतो, पण कदाचित ते लोकांना मजेदार वाटलं नाही. मला माझ्या जोकने कोणालाही दुखवायचे नव्हते. हा जोक मी आलियालाही सांगितला, ते ऐकून ती खूप हसली होती. मी मान्य करतो की माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप वाईट आहे. काही वेळा मी जोक करतो पण माझ्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात. तर, माझ्या जोकमुळे कोणी दुखावलं असेल तर मी त्यांची माफी मागतो,” असं रणबीर म्हणाला.

Story img Loader