बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट बनविणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून संजय दत्त चांगलाच प्रकाश झोतात आला आहे. संजय दत्तच्या या चित्रपटामध्ये त्याच्या भूमिकेत कोण दिसणार यापासून ते त्याच्या आई वडिलांची भूमिका कोण साकारणार अशा अनेक चर्चा रंगल्या. तसेच संजूबाबाच्या आयुष्यात आलेल्या प्रेयसिंच्या व्यक्तिरेखांबाबत देखील चांगलीच चर्चा रंगली. या चित्रपटाचे अद्यापही नाव निश्चित झालेले नाही. मात्र संजूबाबाची भूमिका आणि त्याच्या आयुष्याशी निगडीत काही व्यक्तिरेखांच्या भूमिका जवळ जवळ पक्क्या झाल्या आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत झळकणार आहे. रणबीरने ऑनस्क्रिन संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली असल्याचे त्याचे सध्याचे फोटो तरी निदान हेच सिद्ध करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय दत्तवरील बायोपिकच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच फक्त आणि फक्त काही चर्चांच्या बळावर हा चित्रपट प्रकाशझोतात आला आहे. रणबीर सुद्धा य़ा चित्रपटासाठी फार मेहनत घेत आहे. संजय दत्तची शरीरयष्टी, त्याची चेहरेपट्टी हे सर्वकाही वास्तवदर्शी दाखविण्यासाठी रणबीरने १३ किलो वजन वाढविले आहे. रणबीरने आजवर त्याच्या विविध चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी बरीच मेहनत घेत त्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या नव्या कोऱ्या रुपामध्येही तो संजूबाबाच्या ऑनस्क्रिन भूमिकेला नक्कीच न्याय देईल असे म्हटले जात आहे.  या चित्रपटात रणबीरसोबतच सोनम कपूर आणि अनुष्का शर्मासुद्धा झळकणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. अनुष्का यात पत्रकाराची तर सोनम ही संजूबाबा प्रेमात पडलेल्या त्याच्या एका प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री दिया मिर्झाची देखील या चित्रपटात वर्णी लागली आहे.

संजय दत्तच्या जीवनावर बनणाऱ्या या चित्रपटामध्ये संजूबाबाच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिया मिर्झा, विकी कौशल, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर या अभिनेत्री रणबीरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

(सौजन्य: पिंकविला)

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor beefed up avatar for sanjay dutts biopic directed by rajkumar hirani