बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. २८ सप्टेंबर १९८२ ला जन्मलेला रणबीर कपूर आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा मुलगा रणबीरला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. रणबीरने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारा रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत रणबीरचं नाव बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.

रणबीर कपूरचे शालेय शिक्षण मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झाले आहे. लहानपणापासूनच या अभिनेत्याला अभ्यासात अजिबात स्वारस्य वाटले नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तो १०वी उत्तीर्ण झाला तेव्हा त्याची आजी कृष्णा राज कपूर यांनी घरात एक पार्टी दिली होती, ज्यामध्ये बी टाऊनच्या स्टार्सनी हजेरी लावली होती. एकदा एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या रायने सांगितले होते की, रणबीरने त्याच्या मार्कबद्दल तिच्याशी खोटं बोललं आहे. खरंतर रणबीरला ५४.३ टक्के गुण मिळाले होते, पण त्याने ऐश्वर्याला त्यावेळी ६५ टक्के गुण मिळाल्याचं म्हणत यातच सर्वजण कसे खूश आहेत हे सांगितलं होतं.

TV Couple Mehna Raami Indraneel Love Story
अभिनेत्रीने मालिकेतील जावयाशी खऱ्या आयुष्यात थाटलाय संसार, लग्नाला २० वर्षे झाली पण बाळ नाही; म्हणाली…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Bollywood actress Kareena Kapoor shared a cryptic post
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, करीना कपूरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…
actress Dimple Jhangiani names her daughter Shivona
प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नानंतर ८ वर्षांनी मुलीला दिला जन्म; म्हणाली, “आम्हाला वाटलं की मुलगा होईल, त्यामुळे…”
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
actress Radhika wife of HD Kumaraswamy former Karnataka CM
पळून जाऊन बिझनेसमनशी केलं लग्न, मग २७ वर्षांनी मोठ्या नेत्याबरोबर थाटला दुसरा संसार; माजी मुख्यमंत्र्यांची बायको आहे अभिनेत्री
tina datta talks about being single mother
३३ वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच आई होणार? म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…

आणखी वाचा- “मुलाचं नाव राम ठेवणार नाही…” सैफ अली खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

रणबीरने ‘ब्लॅक’मध्ये संजय लीला भन्साळींना असिस्ट करून करिअरची सुरुवात केली होती. त्याच वेळी, २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण हा चित्रपट यशस्वी झाला नाही. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. चित्रपटांप्रमाणेच रणबीर कपूरही त्याच्या लव्ह लाइफमुळे खूप चर्चेत राहिला. रणबीर कपूर अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खानची माजी पत्नी अवंतिका मलिक हिला डेट करत होता. रणबीरला अवंतिका खूप आवडायची आणि दोघंही जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अवंतिका ‘जस्ट मोहब्बत’ टीव्ही शोसाठी काम करत होती आणि त्यावेळी रणबीर दररोज तिच्या सेटवर जायचा. पण नंतर काही कारणाने दोघंही वेगळे झाले आणि अवंतिकाने इमरानशी लग्न केलं.

आणखी वाचा- “आलिया बेडवर…” रणबीर कपूरने केला बायकोच्या ‘या’ सवयीचा खुलासा

रणबीर कपूरने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याला चॉकलेट बॉय म्हटले जायचे. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्यासह त्याच्या डेटींगची बरीच चर्चा झाली होती. एवढंच नाही तर रणबीरचे नाव सोनम कपूर, नर्गिस फाखरी आणि प्रियांका चोप्रा यांच्याशीही जोडले गेले होते. आलिया आणि रणबीरची भेट २०१७ मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोघांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली आणि लवकरच ते आई-बाबा होणार आहेत.

Story img Loader