रणबीर कपूरचा ४० वा वाढदिवस अनेक कारणांसाठी खास आहे. याच वर्षी त्याचं आलिया भट्टशी लग्न झालं. लवकरच तो बाबा होणार आहे. याशिवाय आलिया भट्टसह त्याचा पहिलाच चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. अभिनेता म्हणून रणबीरने खूप प्रसिद्धी आणि प्रेक्षकांचं प्रेम कमावलं आहे. त्यांचं खासगी आयुष्यातही सर्व काही ठीक सुरू आहे. अशात रणबीरच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या प्रवासाचा उल्लेख करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिवंगत अभिनेते आणि पती ऋषी कपूर यांचाही उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्येष्ठ अभिनेत्री आणि रणबीरची आई नीतू कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मोठ्या ब्रेकनंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. नीतू काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बऱ्याच टीव्ही शोमध्ये हजेरी लावली होती. नीतू कपूर नेहमीच दिवंगत पती ऋषी कपूर यांच्या आठवणी सांगताना दिसतात. रणबीरच्या वाढदिवशीही त्यांनी ऋषी कपूर यांच्या नावाचा उल्लेख करत मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- दीपिका- कतरिना नाही तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर होतं रणबीरचं प्रेम, पण…

नीतू कपूर यांनी रणबीर कपूरसह एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “हा तुझ्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठीच माइलस्टोन आहे. तुझ्या वडिलांची आज आठवण येतेय. मला आशा आहे की ते आज खूप खूश असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा राणा, तू माझं शक्ती अस्त्र आहेस.” आपल्या याच पोस्टमध्ये नीतू कपूर यांनी रणबीरला बेस्ट फ्रेंड आणि आपलं ताकद असल्याचंही म्हटलं आहे.

नीतू कपूर यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूरने या पोस्टवर कमेंट करताना प्रेम व्यक्त केलं आहे. तर फॅशन डिझायनर डब्बू रत्नानीसह इतर अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.