बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज ४०वा वाढदिवस आहे. रणबीर कपूर लवकरच बाबा होणार असल्यामुळे हा वाढदिवस त्याच्यासाठी आणखीनच खास आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. आलियाशी लग्न करण्याआधी रणबीर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने रणबीरला कंडोम भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दीपिका पदुकोणने बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिच्यासह बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही सहभागी झाली होती. करणने दीपिकाला “रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून काय देशील?”, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत “रणबीरला मला कंडोमचं पॅकेट गिफ्ट म्हणून द्यायचं आहे”, असं दीपिका म्हणाली होती. तिचा हा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. दीपिकाचं उत्तर ऐकून रणबीर कपूरचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर संतापले होते. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान यावर भाष्यही केलं होतं.
हेही वाचा >> “माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचं प्रेम प्रकरण हे बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रकरणांपैकी एक आहे. २००८ साली ‘बचना ऐ हसीनो’च्या सेटवर दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. दीपिकाने तिच्या मानेवर रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला होता. रणबीरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्येही गेली होती.
हेही वाचा >> Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी
दरम्यान, रणबीरने आलियाशी लग्नगाठ बांधून त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. लवकरच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. रणबीर-आलियाच्या बाळाला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.