रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दोन दिवसांमध्येच या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. बॉयकॉट ट्रेंडमुळे चर्चेत असलेला हा चित्रपट चालणार की नाही याबाबत शंका होती. मात्र बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चाही समावेश होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये आलियाने साकारलेलं पात्र सध्या चर्चेत आहे. आलियाची मिमिक्री करणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – लग्न, घटस्फोट, दोनवेळा गर्भपात, कर्करोग अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

सोशल मीडियावर मिमिक्री करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे चांदनी. चांदनीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. इतकंच नव्हे तर ती बी-टाऊनमध्ये इतर कलाकारांची मिमिक्रीही करते. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलियाने साकारलेल्या ईशा या पात्राची तिने हुबेहुब नकल केली आहे.

पाहा व्हिडीओ

ईशाचं वागणं, हातवारे, तिच्या बोलण्याची स्टाइल याची नकल चांदनीने केली आहे. तसेच रणबीरने साकारलेल्या शिवा या पात्राचा उच्चार ती या व्हिडीओमध्ये करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे. आलियाची नकल पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – लग्नापूर्वीच आई होण्याचं स्वप्न पाहतेय मृणाल ठाकूर, अभिनेत्रीच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा

आता चित्रपट पाहावाच लागेल, उत्तम मिमिक्री केली आहे, आजच आम्ही ‘ब्रह्मास्त्र’ पाहणार आहोत अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर या व्हिडीओला २ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज देखील मिळाले आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ सुरुवातीपासूनच ट्रोल गँगच्या निशाण्यावर होता. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून #BoycottBrahmastra ट्विटरवर सतत ट्रेंड करत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे या ट्रेंडचा चित्रपटावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही.

Story img Loader