कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरचा अभिनय असलेला ‘फितूर’ या आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरळीतपणे पार पाडून चित्रीकरण लवकर संपवण्याचा चंग दिग्दर्शक अभिषेक कपूरने बांधला आहे. लवकरच कतरिना कैफ, रेखा आणि आदित्य रॉय कपूर हे चित्रपटातील कलाकार चित्रीकरणासाठी काश्मिरला रवाना होणार आहेत. ‘मिसमालिनी डॉट कॉम’या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, चित्रीकरणात खंड न पडण्यासाठी कतरिनाचा तथाकथित प्रियकर रणबीर कपूरला दिग्दर्शक अभिषेक कपूरने चित्रीकरणस्थळी येऊन कतरिनाला भेटण्यास मज्जाव केला आहे. याबाबत कतरिना आणि रणबीर या प्रेमीयुगलाचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचे असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा