बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सतत त्याच्या आगामी चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. रणबीर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकांमुळे त्याला ओळखले जाते. नुकतंच सोशल मीडियावर रणबीरचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना तो का रडतोय असा प्रश्न पडला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने काही तासांपूर्वी रणबीरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीर हा एक ठिकाणी बसून रडताना दिसत आहे. काही वेळाने दिग्दर्शक कट असे ओरडतो. मात्र दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही रणबीरचे अश्रू थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
त्याचा हा व्हिडीओ गुपचूप शूट करण्यात आला आहे. यावेळी त्या व्हिडीओ शूटींगच्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेकजण तो रडत आहे का असा प्रश्नही विचारता दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. रणबीरच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांना तो का रडतोय असा प्रश्न पडला आहे.
अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली विविध कमेंट केल्या आहेत. तर रणबीरचे अनेक चाहतेही त्याला रडताना पाहून गोंधळून गेले आहे. तर काहींनी हे चित्रपटातील दृश्य असल्याचे सांगताना दिसत आहे. त्यासोबत त्याचे काही चाहते कृपया रडू नको, अशी विनंती करताना दिसत आहे.रणबीरच्या या व्हिडीओला तब्बल ५० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान यावेळी रणबीरला एखाद्या घटनेमुळे अश्रू अनावर झाले की काय? याचा अंदाजही चाहते लावताना दिसत आहे.
“मेकअप दादांनी मला काळं केलं आता मी…”, मायराने सांगितला शूटींगदरम्यानचा ‘तो’ मजेशीर किस्सा
रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून या चित्रपटात रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.