बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा बुधवारी ३०वा वाढदिवस झाला. या आघाडीच्या अभिनेत्रीला वाढदिवशी बॉलीवूडकरांनी, सोशल मीडियावरून तिच्या असंख्य चाहत्यांनी आपापल्यापरिने शुभेच्छा दिल्या परंतु, आपल्या कथीत प्रियकर रणबीर कपूरने कतरिनाला खास ‘सरप्राईज’ दिले.
दोघेही आपापल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असले, तरी वेळातवेळ काढून दोघांनी फ्रान्समधील कोर्सिका बेटावर काही वेळ घालविला आणि कतरिनाचा बर्थ डे’ साजरा केला. रणबीर सध्या दिग्दर्शक इमतियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात, तर कतरिना बहुप्रतिक्षीत ‘बँग बँग’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीरने कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर १५ जुलैपासूनच आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला दांडी मारली आणि दोघांनी फ्रान्समधील या निसर्गरम्य बेटावर एकत्र वेळ घालविला.
याआधी रणबीर-कतरिना एक्स मॅनच्या स्क्रिनिंगला एकत्र दिसले होते. बॉलिवूड स्टार्ससाठी लाइट बॉक्समध्ये या हॉलिवूड चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा