अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं बरंच कौतुकही झालं. अनेकांनी आलियाच्या या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगदी प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनीच आलियाच्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पण तिचा बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरनं मात्र आलियाच्या चित्रपटावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. जेव्हा आलियाला याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना रणबीरनं यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही असं आलियानं सांगितलं.

पॅपराजीसोबत बोलताना आलिया भट्ट म्हणाली, ‘सर्वांनाच रणबीरचं या चित्रपटाबाबत काय मत आहे किंवा त्याची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यायचंय. पण तो सोशल मीडिया वापरत नाही. त्यामुळे मी त्याच्या प्रतिक्रियेबाबत काहीच सांगू शकत नाही. मी प्रयत्न करेन की तो यावर प्रतिक्रिया देईल. तेव्हा तुम्हाला प्रतिक्रिया मिळू शकते. पण आता मी त्याची प्रतिक्रिया देऊ शकत नाही.’

आणखी वाचा- “मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”; अदित्य ठाकरेंना टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप

जेव्हा आलियाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी रणबीरनं ‘गंगूबाई काठियावाडी’मधील सिग्नेचर पोझ कॉपी करत गर्लफ्रेंड आलियाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आलियानं त्याचा हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना त्याला, ‘बेस्ट बॉयफ्रेंड एव्हर’ असं कॅप्शन दिलं होतं. आलियाची ही पोस्ट बरीच चर्चेत आली होती.

आणखी वाचा- ‘कच्चा बादाम’चा फेम भुबन बड्याकार यांचा अपघात, गंभीर दुखापतीमुळे प्रकृती चिंताजनक

दरम्यान आलियाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचंही जोरदार कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटासाठी आलियानं बरीच मेहनत घेतली आहे हे तिचा अभिनय पाहिल्यावर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. या चित्रपटात आलियासोबतच अजय देवगण, शांतनू माहेश्वरी, सीमा पाहवा, विजय राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader