अभिनेता रणबीर कपूर लवकरच ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्‍त्र’ या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय त्यापूर्वीच रणबीर आणि आलियाने त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. रणबीर लवकरच बाबा होणार आहे. आलिया भट्टने एक फोटो शेअर करत तिच्या प्रेगेंन्सीची बातमी शेअर केली होती. तेव्हापासून रणबीर कपूरही चर्चेत आला आहे. एवढचं काय तर गुगलवरही रणबीरबद्दल सर्वात जास्त सर्च केलं जात आहे.

रणबीरबद्दल गुगलवर असे चार प्रश्न सर्वाधिक सर्च केले जात आहेत जे ऐकून कदाचित तुम्ही हैराण व्हाल. रणबीरची पहिली पत्नी कोण? तसंच त्याला कोणता आजार आहे? अशा काही विचित्र प्रश्नांची उत्तरं नेटकरी गुगलवर सर्च करत आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

रणबीर कपूरची पहिली पत्नी कोण?

१४ एप्रिल २०२२ रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आलियाआधी रणबीरने दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफ या दोघींना डेट केलं होतं. मात्र दीपिकाने रणवीर सिंहशी तर कतरिनाने विकी कौशलशी लग्न करून रणबीरच्या आधीच संसार थाटला आहे. त्यामुळे रणबीरचं हे पहिलंच लग्न आहे. असं असलं तरी नेटकरी मात्र गुगलवर रणबीरची पहिली पत्नी कोण? असं सर्च करत आहेत.

रणबीर कपूर इंस्‍टाग्रामवर का नाही?

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधतात, सिनेमाचं प्रमोशन करतात आणि रोजच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत असतात. अशात रणबीर कपूर मात्र इन्स्टाग्रामवर नाही. रणबीरचं इन्स्टाग्रामवर अधिकृत अकाऊंट नसलं तरी इतरांच्या पोस्ट पाहण्यासाठी त्याने एक फेक अकाऊंट तयार केलंय. होय, करिना कपूरसह बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी याचा खुलासा केलाय.

रणबीर कपूरला कोणता आजार आहे?

अनेक नेटकऱ्यांनी गुगलवर रणबीरला कोणता आजार आहे हे सर्च केलंय. रणबीरला नेजल सेप्‍टम डेविएशन (Nasal Septum Deviation Disease) हा आजार आहे. २०१३ साली आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमाच्य़ा प्रमोशनवेळी रणबीरने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. या आजारामुळे वास घेण्याची क्षमता कमी होती.

रणबीर कपूर आणि करिना कपूरमध्ये काय नातं?

करीना कपूर आणि रणबीरचं काय नातं आहे? हे जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक आहेत. म्हणूनच रणबीर कपूर आणि करिना कपूरमध्ये काय नातं आहे? हे गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातं. रणबीरचे वडील दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि करिनाचे वडील रणधीर कपूर हे सख्खे भाऊ आहेत. म्हणजेच रणबीर आणि करीना चुलत भावंड आहेत.

एकंदर रणबीर कपूर बाबा होणार ही बातमी कळताच रणबीरबद्दल बरचं काही जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाल्याचं दिसतं आहे.

Story img Loader