आगामी ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटासाठी आयटम सॉंग चित्रित करताना आपल्याला माधुरी दिक्षितच्या गालावर किस करण्याची परवानगी द्यावी, अशी विनवणी आपण चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीकडे केली होती, असं रणबीर कपूर म्हणाला.
येत्या ३१ मे रोजी प्रदर्शित होणा-या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटासाठी माधुरी दिक्षितने नुकतेच चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या रणबीर कपूरसोबत आयटम सॉंगचे चित्रिकरण पूर्ण केले.
ती (माधुरी) माझे पहिले प्रेम होती आणि तिचे लग्न झाल्यावर मी खूप दु:खी झालो होतो. मला तिच्यासोबत नाचण्याची संधी मिळाली तेव्हा तीला पाहून मला खूप आनंद झाला होता, असं रणबीर कपूर चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात म्हणाला.
अगदी निर्मळपणे कबुली देताना रणबीर म्हणाला, माधुरीला गालावर किस करण्यासाठी मला माझ्या दिग्दर्शकाला माझ्या पध्दतीने लाच द्यावी लागली.
चित्रपटातील ‘घागरा’ या आयटम सॉंगचे नृत्यदिग्दर्शन फराह खानने केले आहे.
माधुरी ही कामाबाबत अतिशय काटेकोर, मन लावून काम करणारी आणि अतिशय गुणी अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली.
मागच्या वर्षी बर्फी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी रणबीर कपूर ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाच्या सेटवर गेला होता, तेव्हा त्याने माधुरीबाबतच्या आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या होत्या.
महत्वाचं म्हणजेस, रणबीरचे वडिल रिषी कपूर यांनी माधुरीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader