रॉकस्टार, बर्फी आणि आता तमाशा एकामागून एक वेगवेगळ्या चित्रपटांमधून आपल्या कसदार अभिनयाचा नजराणा प्रेक्षकांपुढे ठेवणारा अभिनेता रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे. अनेक तरूण, तरुणीच नव्हे, तर खुद्द बॉलिवूडमधील तरूण फळीतील अनेक कलाकार रणबीरच्या अभिनयाचे चाहते आहेत.
अभिनेता रणवीर सिंग यानेही आपल्याला रणबीर कपूरचा अभिनय बघूनच प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, रणबीर कपूरचे सगळे चित्रपट मी पाहिलेत. तो कसदार अभिनेता आहे. त्याच्याकडूनच मला अभिनयाची प्रेरणा मिळते. मला तरी अभिनेता म्हणून तो सर्वोत्कृष्ट वाटतो. त्याच्यातील गूण व्यक्त करण्यासाठी मला शब्द कमी पडतात.
रॉकस्टार आणि बर्फीमध्येही रणबीर कपूरने उत्तम अभिनय केला होता. ‘तमाशा’तील अभिनय या सगळ्याचा कळस गाठेल, असे मी त्याला मागेच सांगितले होते, असेही रणवीस सिंगने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा