बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस मलेशियातील लंगकावी येथे विक्रमजीत सिंगच्या ‘रॉय’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. अर्जुन रामपालची देखील भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार असल्याचे समजते. जॅकलिन फर्नांडिस दुहेरी भूमिका साकारत असून, रणबीर एका चोराची व्यक्तिरेखा वठवत असल्याची माहिती मिळाली. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Story img Loader