बॉलिवूडची हॉट जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मे महिन्यामध्येच साखरपुडा करणार असल्याचे समजते. लवकरच याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. अलीकडेच कतरिना रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांसमवेत एका डिनर डेटचा आनंद घेताना आढळून आली होती. यानंतर त्या दोघांमधील लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण यायला लागले. हॉलिडे ट्रिप असो अथवा मित्रांच्या घरी पार्टी रणबीर आणि कतरिना नेहमी एकमेकांबरोबर दिसतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस रणबीर आणि कतरिनाच्या घरचे एका खास सोहळ्याचे आयोजन करत असल्याचे समजते, ज्यात दोघांच्या रिलेशनशिपला अधिकृत स्वीकृती देण्यात येईल. कुटुंबातील काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडणार असल्याचे समजते. हा खास सोहळा म्हणजे या दोघांचा साखरपुडा तर नव्हे ना, अशी शंका अनेकांकडून व्यक्त होत आहे.
रणबीर आणि कतरिनाचे ‘हम बने तुम बने एक दूजे के लिए’
बॉलिवूडची हॉट जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मे महिन्यामध्येच साखरपुडा करणार असल्याचे समजते.
First published on: 05-05-2015 at 02:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor katrina kaif engagement or roka to take place this month