काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर हा, आमिर खान आणि किरण राव यांच्याबरोबर डिनरसाठी गेला होता. कॅनडियन चित्रपटनिर्माती मेलानी इस्टन हिने आमिर आणि रणबीरसोबतची छायाचित्रे टि्वटरवर प्रसिद्ध केली होती. त्याच हॉटेलमध्ये कॅटरिनाही उपस्थित होती. याबाबत मेलानीला विचारले असता ‘कॅटरिनासुद्धा या डिनर पार्टीला उपस्थित असल्याचे’ तिने सांगितले.
रणबीर आणि कॅटरिना हिने अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध असण्याची चर्चा होती. परंतु, दोघांनीही ही बातमी खरी असल्याचे अद्याप मान्य केलेले नाही. गेल्या महिन्यात करण जोहरच्या वाढदिवसाला दोघे एकाच गाडीत आले होते. तसेच, रणबीर आणि कॅटरिना हे एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader