ना तो ‘धूम गर्ल’ कतरिना कैफबरोबरची त्याची रिलेशनशिप स्विकारत आहेत ना अमान्य करत आहेत, अशा परिस्थितीत रणबीर कपूर त्याच्या या ‘लेडी लव्ह’बरोबर चित्रपट पहायला आलेला असताना छायाचित्रकारांनी त्याला कॅमेराबध्द केले. रणबीर आणि कतरिना लिओनार्डो दिकॅप्रिओचा ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रिट’ हा चित्रपट पाहाण्यासाठी आले होते. बॉलिवूडमधील इतर कलाकार सुध्दा हा चित्रपट पाहाण्यासाठी आले होते.

यावेळी रणबीर आणि कतरिना एकदम मोकळेपणाने वावरत होते. अलिकडेच प्रदर्शित झालेला कतरिनाचा ‘धूम’ ३ हा चित्रपट तिकीट बारीवर धूम माजवत असल्याने कतरिना खूप आनंदात आहे. काळ्या रंगाची मॅक्सी आणि बूट घातलेल्या कतरिनाच्या चेहऱ्यावर हा आनंद झळकत होता. तर, रणबीर कॅमेऱ्याला टाळत होता. माध्यामांशी विचित्रपणे वागणाऱ्या रणबीरचा शर्ट, डेनीम, स्निकर्स आणि कॅप असा कॅजुअल अवतार होता.


या वर्षाच्या सुरूवातीला रणबीर आणि कतरिना स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानाची प्रसिध्द झालेली छायाचित्रे खूप गाजली होती. असे असले तरी दोघेजण अद्याप एकमेकांचे फक्त चांगले मित्र असल्याचेच सांगत आहेत. २०१४मध्ये कदाचीत ते त्यांच्या प्रेमाचा स्विकार करतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

Story img Loader