रणबीर-कतरिना त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे नेहमीच नाकारत आले आहेत. मात्र, या दोघांचे जवळीक साधतानाचे स्पेनमधील हे छायाचित्र पाहून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समजते. दोघेही अलीकडेच दुबईत सुट्टी घालविताना दिसले होते. त्यानंतर ते दिग्दर्शक अयान मुखर्जीला भेटण्यासाठी युरोपला गेले. अर्जुन कपूर आणि करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये एकत्र दिसल्यानंतरही आमच्या दोघांमध्ये केवळ मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. पण, या छायाचित्रकडाकडे पाहता दोघांमध्ये काही वेगळेच चित्र असल्याचे दिसते. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी रणबीर-कतरिना जवळ आले. तसेच लंडन दौ-यावर असताना कतरिना आणि नीतू सिंग एकत्र डिनर करताना आढळल्या होत्या. त्यामुळे नीतू सिंगचेही कतरिनाशी चांगलेच जुळत असल्याचे दिसते.
हृतिकच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेमुळे कतरिनालाही ‘धूम ३’च्या चित्रिकरणातून सुट्टी मिळाली आहे. मात्र, १६ जुलैला आपला २९ वा वाढदिवस साजरा करणारी कतरिना भारतात परतल्यावर पुन्हा ‘धूम ३’च्या चित्रिकरणात व्यस्त होईल.

Story img Loader