रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी. त्यांच्यात सतत काहीनाकाही बिनसत असल्यामुळे चर्चेत असते. सध्या त्यांच्यात असेच काहीसे झाल्यासारखे दिसतं. नव वर्षाच्या स्वागताची न्यूयॉर्कमधील सुटी संपवून परतीच्या प्रवासात त्यांच्यात काही मतभेद झाल्याचे समजते. गेले काही महिने एकमेकांच्या अतिशय जवळ असलेले हे प्रेमीयुगूल न्यूयॉर्कमधील सुटी संपवून एकत्रितपणे न येता वेगवेगळे परतले. चित्रपटसृष्टीत या बाबतच्या चर्चेने जोर पकडला. या वर्षी अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांपासून अलिप्त राहिलेल्या कतरिनाने ‘उमंग’ कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य सादर केले.

अनेक वेळा रात्री उशीरा एकत्र दिसणारे रणबीर आणि कतरिना सोमवारी मात्र तसे दिसले नाहीत. यूटीव्हीच्या सिध्दार्थ रॉय कपूरच्या घरी रणबीर एकटाच दिसला. रणबीर आणि कतरिना सध्या अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’मध्ये एकत्र काम करीत असून, सेटवरसुद्धा दोघे एकमेकांपासून अंतर ठेवून वावरताना आढळून येतात. आशा करुया की त्यांच्यात काही गंभीर मामला नसून, प्रेमातील अल्पसा रुसवा-फुगवा असेल.

Story img Loader