बॉलिवूड अभिनेता रनबीर कपूर त्याची प्रेयसी कतरिना सोबत अजून एका ‘खासगी’ सुट्टीवर गेला असल्याचे वृत्त आहे. मात्र, यावेळी रनबीर-कतरिना यांनी सुट्टीसाठी निवडलेले ठिकाण न्यूयार्क आहे.
‘बेशरम’ रिलीज झाल्या नंतर रनबीरला थोडे दिवस विश्रांतीची आवश्यकता वाटली असल्याने तो सुट्टीवर गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. रनबीर सोबत ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आयान मुखर्जी देखील असल्याचे सांगण्यात आले आहे.
रनबीरने या दौऱ्याला गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रनबीरच्याच एका मित्राने त्याच्या या खासगी सुट्टीची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.
रनबीर, कतरिना आणि अयान तिघे ऑगस्टमध्ये स्पेनच्या लिबिझा येथे सुट्टीसाठी गेले होते. त्यावेळचे कतरिनाची बिकिनीवरची छायाचित्रे प्रसिध्द झाली होती. त्या नंतर मात्र, रनबीरला कतरिनाचे त्याच्या आयुष्यातील स्थान लपविता आले नाही.
रनबीर ‘बिग अँपल’ या ठिकाणी मोठे घर विकत घेत असल्याच्या देखील अफवा जोर धरत आहेत.
रनबीर कपूर, कतरिना न्यूयार्कमध्ये खासगी सुट्टीवर?
बॉलिवूड अभिनेता रनबीर कपूर त्याची प्रेयसी कतरिना सोबत अजून एका 'खासगी' सुट्टीवर गेला असल्याचे

First published on: 09-10-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor on a secret vacation with lady love katrina kaif in new york