बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर सध्या यशाच्या शिखरावर असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकरत असलेला रणबीर अजूनही काही भूमिका करण्यासाठी आतुर आहे. रणबीर म्हणाला की, मला खलनायकाची भूमिका करण्याची इच्छा खूप आधीपासून आहे. मी अशीही भूमिका करू शकतो हे मला प्रेक्षकांना दाखवायचे आहे. तसेच, द बॅटमन सिरीजप्रमाणे जोकर चित्रपटाचीही सिरीज व्हावी, असे मला वाटत असून ही भूमिका करायला मला आवडेल.
राजेश खन्ना यांनी आनंद चित्रपटात केलेली आनंदची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी त्यात खूप छान काम केले होते. अशा हृदयस्पर्शी भूमिकेचा भाग व्हायला मला आवडेल, असेही तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा