अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. रणबीर आणि आलिया भट्ट लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र एका चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटासाठी आलिया-रणबीरची निवड करण्यात आली होती. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. रणबीर याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात त्याने विशाखापट्टणमपासून केली आहे.

विशाखापट्टणममधील रणबीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रणबीर विशाखापट्टणमच्या विमानतळावर पोहोचताच त्याच्यावर फुलांचा वर्षाव होतो. इतकंच नव्हे तर त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमलेली देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे भरगर्दीत देखील रणबीर त्याच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष करत नाही.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
zaheer iqbal Shatrughan Sinha birthday video
Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी

आणखी वाचा – Timepass 3 : “आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण मार्बल फोडेल”, ‘टाईमपास ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

चाहते रणबीरला फुल देत असताना त्याचे सुरक्षारक्षक सगळ्यांना बाजूला सारताना यामध्ये दिसतात. पण रणबीर त्यांना थांबवत फुलांचा स्वीकार करतो. चाहत्यांबरोबर हात मिळवतो आणि हसतमुखाने जमलेल्या गर्दीला हात दाखवताना दिसत आहे. रणबीरची हीच गोष्ट उपस्थितांना खूप आवडली. सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ व्हायरल होताच रणबीरचं कौतुक होताना दिसत आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये फक्त एकच माणूस, व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक म्हणाला…

या व्हिडीओमध्ये रणबीरबरोबरच दिग्दर्शक अयान मुखर्जी, एस एस राजामौली देखील दिसत आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपटांमधील एक चित्रपट आहे. यामध्ये रणबीर एक नवा अवतार पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, नागा अक्किनी, मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत दिसतील. धर्मा प्रॉडक्शन प्रस्तुत हा चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Story img Loader