अभिनेता रणबीर कपूर त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. विशेषतः त्याचं लव्ह लाइफ नेहमीच चर्चेचा विषय ठरलं आहे. सध्या रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडेच रणबीरनं त्याचे काका राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट ‘तुलसीदास ज्युनिअर’च्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. यावेळचा रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
रणबीर कपूरच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स त्याच्याशी बोलताना दिसत आहेत. एक फोटोग्राफर त्याला म्हणतो, ‘बाय आरके लग्नात भेटूयात’ फोटोग्राफरच्या अशा बोलण्यावर रणबीरची प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी आहे. तो फोटोग्राफरला विचारतो, ‘कोणाचं लग्न?’ त्याचं बोलणं ऐकून सर्वच फोटोग्राफर हसू लागतात. त्यानंतर तो फोटोग्राफर लव रंजनच्या लग्नाबाबत बोलत होतो असं स्पष्ट करतो. पण रणबीरची प्रतिक्रिया मात्र फोटोग्राफर त्याच्याच लग्नाबाबत तर बोलत नाहीयेत ना अशीच होती हे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
रणबीर कपूरचा हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर मानव मंगलानीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी कमेंट करत, ‘रणबीरला राग आला आहे’ असं म्हटलं आहे. दरम्यान दिग्दर्शक लव रंजन २० फेब्रुवारीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यानं ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्विटी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.