बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय अभिनेता आहे. रणबीरचे लाखो चाहते आहेत. रणबीरने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा कार्यक्रम राज कपूर यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या ‘राज कपूर : द मास्टर अॅट वर्क’ या पुस्तकाच्या लॉन्चचा होता. त्यावेळी एका पॅनल डिस्कशनमध्ये रणबीरने खुलासा केला की संजय लीला भन्साळीला असिस्ट करत होता तेव्हा संजय लीला भन्साळी फक्त त्याला शिवी-गाळ करत नव्हते तर मारायचे सुद्धा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीरने सांगितले की सुरुवातीला तो संजय लीला भन्साळीच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायचा. जेव्हा ब्लॅक या चित्रपटासाठी रणबीर संजय लीला भन्साळीला असिस्ट करत होता. तेव्हा संजय लीला भन्साळी रणबीरला एका स्टारकिडची वागणूक देत नव्हते तर एका असिस्टंटला जशी वागणूक दिली जाते तशी द्यायचे, असे रणबीर म्हणाला.

आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट

पुढे रणबीर म्हणाला, ‘मी तासनतास गुडघ्यावर बसायचो. ते आम्हाला मारायचे. शिविगाळ करायचे. ज्यामुळे या जगात जगण्यासाठी तुम्ही तयार होता. माझ्या पिढीतील चित्रपट निर्माते फक्त व्यावसायिक पैलूंच्या मागे धावत आहेत.’

आणखी वाचा : “मी त्या अपराधीपणाने जगत आहे…”, ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत

दरम्यान, रणबीरने संजय लीला भन्साळीच्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात रणबीरसोबत सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. तिने देखील याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता.