अभिनेता ऱणबीर कपूर आपल्या विविधांगी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळे लूक्स आणि वेगवेगळ्या भूमिका यांनी तो प्रेक्षकांचं कायम मनोरंजन करत असतो. अशीच एक वेगळी आणि नवी भूमिका घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रणबीर कपूरचा नवा चित्रपट लवकरच पहायला मिळणार असून या चित्रपटातली त्याची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. ‘ऍनिमल’ या चित्रपटातून रणबीर प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचं आहे.  या चित्रपटात परिणीती चोप्रा, बॉबी देओल, अनिल कपूर हे कलाकारही त्याच्यासोबत दिसणार आहेत. या चित्रपटातल्या कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून ही बातमी शेअर केली आहे.

या चित्रपटाची रिलीज डेट आता समोर आली आहे. हा चित्रपट २०२२ म्हणजे पुढच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गुन्हेगारी विश्वावर आधारीत असून यात बॉबी देओल रणबीरच्या भूमिकेच्या विरोधातली भूमिका साकारणार आहे.  परिणीती आणि अनिल कपूर यांच्या भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत. त्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून रणबीर कपूर आपल्या क्षमता विस्तारताना दिसत आहे.

या वर्षातच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होईल. पण त्याआधी रणबीर लव रंजनच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करेल.

परिणीतीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. नुकताच तिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षक-समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Story img Loader