बॉलिवूडचा बॅचलर रणबिर कपूरची बॅचलरकी लवकरच जाण्याच्या मार्गावर आहे. मिड डे डॉट कॉमच्या वृत्तानुसार रणबिर येत्या २८ सप्टेंबरला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची अफवेतील गर्लफ्रेंड कतरिना कैफ पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवणार आहे.
रणबिरने कतरिना कैफशी लग्नाच्या बेडीत अडकण्याचे पक्के केले असून, तो लवकरच त्यांच्या नात्याबद्दल जाहिर बोलेल असे त्या वृत्तामध्ये पुढे म्हटले आहे.
रणबिर परिकथेतील पध्दतीप्रमाणे गुढगे टेकवत कतरिना समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे.
स्पेनमधील समुद्र किनाऱ्यावरील रणबिर-करिनाची वेधक छायाचित्रे बरेच दिवस माध्यमांमधून झळकत होती.
दरम्यान, वडील ऋषी कपूर आणि आई नितू सिंग मात्र, मुलगा रणबिरच्या निवडीवर नाखुष असल्याचे वृत्त आले होते.
कतरिनाच्या प्रवक्त्याने मात्र, ही एक अफवा असून, रणबिर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या ‘बेशरम’ चित्रपटाच्या प्रसिध्दीमध्ये व्यस्त असणार असल्याचे सांगितले आहे.
रणबिर कपूर करणार कतरिनाला प्रपोज?
बॉलिवूडचा बॅचलर रणबिर कपूरची बॅचलरकी लवकरच जाण्याच्या मार्गावर आहे.
First published on: 29-08-2013 at 05:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor to propose katrina kaif on his birthday