‘बर्फी’नंतर रणबीर आणि अनुराग बसू पुन्हा एकदा नवीन चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. अनुरागच्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटामध्ये रणबीर, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका करणार आहेत.
रणबीरसोबत प्रियांका आणि आलिया चित्रपटात रोमान्स करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. रणबीर आणि अनुरागच्या ‘पिक्चर शुरु’ या संयुक्त निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रित होणारा ‘जग्गा जासूस’ हा पहिला चित्रपट असून याची कथा प्रसिद्ध गुप्तहेर शेर्लोक होल्मस याच्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे चित्रिकरण ऑक्टोबरला सुरु होण्याची शक्यता आहे.
‘जग्गा जासूस’ व्यतिरीक्त रणबीर अभिनव कश्यपच्या ‘बेशरम’ आणि अनुराग बसूच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटासाठी काम करत आहे. तर, प्रियांका संजय लीला भन्सालीच्या ‘मेरी कोम’ आणि आलिया ‘२ स्टेट’, ‘हायवे’ चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

Story img Loader