आपल्या “ये जवानी है दीवानी”  या आगामी चित्रपटात माधुरी दिक्षितसोबत विशेष गाणे करणा-या बॉलिवूड स्टार रणबीर कपूरने आपले ह्रदय, नृत्यांगणा माधुरी दिक्षितसाठी धडकत असल्याची कबूली दिली आहे.
या ३० वर्षीय अभिनेत्याचे नाव नेहमीच त्याच्या चित्रपटांतून काम करणा-या तारकांसोबत जोडले जाते. मात्र, आपल्या सह-अभिनेत्रींना आपण चांगले मित्र मानतो असे रणबीर म्हणतो. “त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मी त्यांच्या सोबत चित्रपटांतून काम करत असल्याने कदाचित लोक आमच्याबद्दल बोलत असतील. माझे ह्रदय फक्त एका स्त्रीसाठी धडकते आणि तीचे नाव माधुरी दिक्षित आहे. या चित्रपटामुळे तिच्यासोबत नृत्य करण्याची माझी लहानपणीची इच्छा पूर्ण झाली आहे. तिच्यासोबत काम करायला मिळालं हे माझ भाग्यचं आहे.” असं “ये जवानी है दीवानी” चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात तो म्हणाला.
येत्या ३१ मे रोजी प्रदर्शित होणा-या “ये जवानी है दीवानी”  या चित्रपटात रणबीर आणि माधुरीचे “घागरा” हे आयटम गाणे आहे.
रणबीरच्या विनवणीने चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जींने घागरा या गाण्यात शेवटी एका चुंबन दृष्याचा समावेश केला आहे.
“आयुष्यात अशी संधी पुन्हा कधी मिळेल किंवा नाही मला माहित नाही. हे चुंबन दृष्य करताना मी तीन वेळा अपयशी ठरलो आणि चौथ्या वेळी माझ्या प्रयत्नांना यश आले”, असे रणबीर म्हणाला.
माधुरीला आपली स्वप्नसुंदरी म्हणत, तो पुढे म्हणाला, “जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा सगळीकडे प्रकाश पसरतो.”
अनुराग बासूच्या मुक्या-बहि-या ‘बर्फीने’ रणबीरला मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळवून दिली असली तरी तशाच प्रकारच्या भूमिका करण्यास तो तयार नाही.
“मला सतत वेगळ्या भूमिका करायला आवडतात. अॅक्शनपट, थरारपट आणि रहस्यपट करण्याची माझी इच्छा आहे.” असं रणबीर पुढे म्हणला.
तुझ्या वडिलांचीच एखादी भूमिका तुला करायला आवडेल का, असे विचारल्यावर ऱणबीर म्हणाला, “मी माझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता आहे, कारण ते खूप चांगले अभिनेते आहेत. परंतू त्यांच्या कुठल्याही भूमिकेला मी न्याय देऊ शकेन असे मला वाटत नाही.”  

Story img Loader