रणबीर कपूर आणि विद्या बालनने आयफा-२०१३चा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. विद्या बालनने ‘कहानी’ चित्रपटातील पतीचा शोध घेत असलेल्या गरोदर स्त्रीच्या भूमिकेसाठी तर रणबीरला ‘बर्फी’साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिषेक बच्चनकडून पुरस्कार स्वीकारताना विद्याने दिग्दर्शक शुजीत सरकारचा विशेष उल्लेख केला. यावेळी ती म्हणाली, ” मी हा पुरस्कार दिग्दर्शक शुजीतला अर्पण करु इच्छिते. ‘पा’ चित्रपटासाठी अॅमस्टरडॅम येथे झालेल्या सोहळ्यात मला पहिला आयफा पुरस्कार मिळाला होता.” ‘बर्फी’मध्ये मुकबधीर मुलाची भूमिका करणारा रणबीर कपूर मात्र यावेळेस पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित नव्हता. त्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेता पदाचा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी रणबीरच्यावतीने स्वीकारला. यापूर्वी रणबीरला (रॉकस्टार) आणि विद्याला (डर्टी पिक्चर)साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. बॉलीवूडमधील ‘अग्नीपथ’, ‘विकी डोनर’ आणि ‘गॅंग ऑफ वासेपूर’ या चित्रपटांना मागे टाकून अनुराग बासूच्या प्रणयरम्य-विनोदी ‘बर्फी’ चित्रपटाने वर्षभर अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
दीपिका-रणबीरच्या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला. तर गौतम आणि आयुष्यमान खुरानाला ‘विकी डोनर’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधील सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात अभिषेक, माधुरी, श्रीदेवी, प्रभूदेवा, दीपिका आणि सुशांत सिंग राजपूत या कलाकारांनी नृत्य सादर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा